Anuradha Vipat
केतकी चितळे आणि वाद हे समीकरण नवीन नाही. सतत काहीना काही वादग्रस्त विधानं करून ती प्रसिद्धी झोतात येत असते
आता केतकी चितळे पुन्हा अडचणीत सापडली आहे. केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
नुकतीच केतकी चितळे परळी येथे पार पडलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेत सामील झाली होती.
यावेळी केतकी चितळे हिने ॲट्रॉसिटी कायद्याविरोधात वक्तव्य केली आहेत. यामुळेच आता पुन्हा एकदा केतकी चितळे वादात अडकली आहे.
केतकीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे दलित आणि मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हणत, तिच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परळी बीडमधील दलित आणि मराठा बांधव करत आहेत.
केतकीच्या याच वक्तव्यानंतर आता तिच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.