Anuradha Vipat
२०० कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एक पत्र पाठवलं आहे.
सुकेशने त्याच्या वाढदिवसाआधीच तिला प्रेमपत्र लिहिलं आहे. या प्रेमपत्रात सुकेशने जॅकलिनला त्याच्या वाढदिवसाच्या भेटवस्तूबद्दलही लिहिलं आहे.
सुकेशने पत्रात लिहिलंय, २५ मार्च रोजी माझ्या वाढदिवसाआधी दिलेल्या गिफ्टसाठी धन्यवाद. हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट आहे. हे गिफ्ट आहे, जॅकलिनचं यम्मी यम्मी गाणं. हे गाणं ऐकून मी हैराण आहे.
सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
अनेक चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्रींचं नाव त्याच्याशी जोडल्याची चर्चा होती.
काही दिवसांपुर्वी जॅकलिनने कोर्टात बोलताना, सुकेशने तिची फसवणूक केल्याचं म्हटलं होतं