Anuradha Vipat
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
एका सराफा व्यापाऱ्याने सोनं गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि अन्य लोकांनी फसवणूक केली असल्याची सांगत कोर्टात धाव घेतली आहे.
आता शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर तपासानंतर आरोप खरे सिद्ध झाले तर पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या सर्व आवश्यक कलमांतर्गत एफआयआर नोंदवावी
राज कुंद्रा यांच्याविरोधात याआधीच ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे.
ईडीने काही स्थावर मालमत्ताही जप्त केली आहे.
तसेच अॅडल्ट फिल्म प्रकरणीही राज कुंद्राविरोधात आरोप आहेत.