सकाळ डिजिटल टीम
अणुस्कुरा घाटात गुरुवारी (ता. १३) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारी आणि कोकणात जाणारी वाहतूक ठप्प झाली.
भलेमोठे दगड रस्त्यात आल्यामुळे ते बाजूला करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे होते.
काल सायंकाळी उशिरापर्यंत जेसीबीच्या मदतीने काम सुरू होते.
दगड फोडण्यासाठी ब्रेकर मागवण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा हाकली जात होती.
पश्चिम महाराष्ट्राकडून राजापूरमधून येणारा भाजीपाला, दूध यांसह अन्य वाहतूक पूर्णतः थांबली होती.
तब्बल 24 वीस तासांनंतर घाटमार्गातून (Anuskura Ghat) वाहतूक सुरू झाली आहे.