kimaya narayan
बॉलिवूडमधील सध्याचा आघाडीचा सेलेब्रिटी इन्फ्लुएन्सर ऑरी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकतंच ऑरीने हॅलोविननिमित्त एक खास फोटोशूट शेअर केलं. आमिर खानच्या गाजलेल्या सिनेमाच्या पोस्टरमध्ये स्वतःचे फोटो मॉर्फ करत त्याने हे सिनेमे ऑरीमय केले आहेत. म्हणजेच तारे जमीन पर झालाय ऑरी जमीन पर.
लगानच्या पोस्टरवर ऑरी भुवनच्या वेशात दिसतोय तर जान्हवी कपूर गौरी आणि ख़ुशी कपूर एलिझाबेथ बनली आहे.
इतकंच नाही दिल चाहता है बनलाय ऑरी चाहता है आणि त्यातील ऑरीचा लूक बघून अनेकांना हसू अनावर झालं.
रंग दे बसंती मध्ये ऑरी चंद्रशेखर आझाद यांच्या लूकमध्ये दिसतोय.
तलाश या सिनेमाला त्याला द आन्सर लाईज विथ ऑरी असं कॅप्शन दिल आहे आणि यातील त्याचा पोलीस इन्स्पेक्टरचा लूक भन्नाट दिसतोय.
आमिरचा प्रसिद्ध थ्री इडियट्स बनलाय वन इडियट. पोस्टरवर अनेकांना ऑरीला पाहून आश्चर्य वाटलं.
मंगल पांडे सिनेमातील ऑरीचा हा लूक बघून अनेकजण चकित झाले. त्याने या पोस्टरचं कॅप्शन 'ऑरी रायझिंग' असं केलं आहे.
पीके झालाय ओके आणि या पीके लूकमधील ऑरी भन्नाट दिसतोय.
दंगलच्या पोस्टरमध्ये सगळीच कास्ट ऑरीमय दिसतेय. हे बघून अनेकांना हसू अनावर झालं.
तर सगळ्यात गाजतोय ऑरीचा गजिनी लूक. याचं कॅप्शन बदलून त्याने रिमेम्बर ऑरी असं केलं आहे. त्याने या फोटोसिरिजला माय नेम इज खान असं कॅप्शन दिलंय.