९ ते १० तासांची झोप घेणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक

Monika Lonkar –Kumbhar

निरोगी जीवनशैली

निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार, व्यायाम आणि 6-7 तासांची पुरेशी झोप अतिशय महत्वाची आहे. 

oversleeping problems

जास्त झोप

जास्त वेळ झोप घेणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त वेळ झोपल्याने आरोग्याचे नुकसान होते. शिवाय, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

oversleeping problems

मधुमेह

९ ते १० तासांची झोप घेतल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. त्यामुळे, मधुमेहाचा धोका निर्माण होतो असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

oversleeping problems

लठ्ठपणा

आजकाल लठ्ठपणाची समस्या देखील वाढत चालली आहे. एका संधोधनानुसार जे लोक रोज रात्री ९ ते १० तासांची झोप घेतात त्यांचे वजन वाढते. या उलट जे लोक ६-७ तासांची पुरेशी झोप घेतात त्यांचे वजन नियंत्रणात राहते.

oversleeping problems

डोकेदुखी

अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. डोकेदुखी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकीच एक कारण म्हणजे जास्त वेळ झोप घेणे. सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही जास्त वेळ झोप घेतली तर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

oversleeping problems

ताण-तणाव

९ ते १० तास किंवा त्यापेक्षा अधिक तासांची झोप घेतल्याने तुम्हाला ताण-तणावाची आणि नैराश्याची समस्या उद्भवू शकते.

oversleeping problems

पाठदुखी

नेहमी झोप घेता त्यापेक्षा जास्त तासांची झोप घेतल्याने पाठदुखीचा त्रास संभवतो. त्यामुळे, जास्त तासांची झोप घेणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

oversleeping problems