kimaya narayan
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5मुळे अभिनेते पंढरीनाथ कांबळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
जान्हवीने त्यांचा अभिनयावरून केलेला अपमान आणि निक्कीचं जोकर म्हणणं प्रेक्षकांना खूप खटकलं आणि अनेकांनी यावरून जान्हवी, निक्कीला खडेबोल सुनावले.
पॅडी यांनी त्यांच्या आयुष्यात खूप स्ट्रगल केला आहे. त्यांना प्रसिद्धी मिळण्यापूर्वी त्यांनी अनेक छोटे मोठे जॉब केले.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत पंढरीनाथ कांबळे यांनी सांगितलं नाटकात काम करणं त्यांच्या आईला आवडायचं नाही. त्यातच त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती.
पंढरीनाथ यांनी पेपर टाकणे, पॅकिंगची काम करणे, छोटे-मोठे जॉब करणे अशी बरीच काम या काळात केली.
तर स्ट्रगलच्या काळात जे पैसे मिळायचे त्यावेळी एक रुपयाला झुणका भाकरी मिळायची. त्यावेळी ते ही झुणका भाकरी खायचे आणि त्यांचा दिवस ढकलायचे.