सकाळ डिजिटल टीम
हेर्ले (ता. हातकणंगले) येथील पद्मश्री सचिन तेरदाळे यांनी गेल्या दहा वर्षांपासून बिस्कीट निर्मितीत वेगळा ठसा उमटवला आहे.
दहा बाय दहाच्या खोलीतून ते हातगाड्यावर सुरू झालेल्या बिस्किटाच्या निर्मिती उद्योगाला कलाटणी मिळाली.
केवळ जिल्हाभर नाही तर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांत त्यांनी भरारी घेतली आहे.
सध्या दिवसाला वेगवेगळ्या धान्यांपासून आठशे किलो पौष्टिक बिस्कीट निर्मिती करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
नियमित ग्राहकांबरोबरच मधुमेहींसाठी उपयुक्त स्पेशल बिस्किटे, खास करून सेंद्रिय ऊस व त्याच्या गुळापासून तयार केली.
विविध राज्यांतील मागणीनुसार विविध उत्पादने करून त्यांनी बिस्किट व्यवसाय प्रगतिपथावर आणला आहे.
हा व्यवसाय अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
किंमत, घटक, किती दिवस वापरावे याचे प्रिंटिंग करताना महिला कर्मचारी. (सर्व छायाचित्रे : बी. डी. चेचर)