टाळ-मृदुंगाचा गजर अन् मुखी हरिनाम... बाल वारकऱ्यांच्या रिंगण सोहळ्याने जिंकली मने

Sandip Kapde

‘श्रीसंतांचिया माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळ उतरी, वाढले अंतरी प्रेमसुख।। विठ्ठल-विठ्ठल म्हणा वेळो-वेळा। हा सुखसोहळा स्वर्गी नाही।।’

paduka darshan sohala 2024 | esakal

संत तुकोबारायांच्या या अभंगातील ओढ दर्शविणाऱ्या वर्णनाप्रमाणेच आळंदी (देवाची) येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी अनुभवलेल्या सोहळ्याचे वर्णन केले.

paduka darshan sohala 2024 | esakal

वारकरी संस्थेत दररोज मिळणाऱ्या आध्यात्मिक सेवेचे धडे घेत माउलींच्या नामस्मरणात तल्लीन असणाऱ्या या चिमुकल्यांनी स्वर्गीही अनुभूती मिळणार नाही, अशा क्षणांचा लाभ घेतल्याची भावना व्यक्त केली.

paduka darshan sohala 2024 | esakal

पांढरा कुर्ता, पांढरे धोतर, कपाळी टिळा आणि गळ्यात टाळ घेत पारंपरिक वेशात हे बालवारकरी सहभागी झाले होते.

paduka darshan sohala 2024 | esakal

अठरा संतांच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी मिळणार म्हटल्यावर होणारा आनंद बालमुखांवर ओसंडत होता.

paduka darshan sohala 2024 | esakal

आळंदी येथील या संस्थेत चौथीपासून दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. या उत्सवानिमित्ताने सर्व संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, असेही या मुलांनी नमूद केले.

paduka darshan sohala 2024 | esakal

विद्यालयातील चाळीस मुले या उत्सवात सहभागी झाली. हरिपाठ, संतांचे अभंगांच्या माध्यमातून भगवंतांचे नामस्मरण करीत ही मंडळी मुंबई नगरीत दाखल झाली.

paduka darshan sohala 2024 | esakal

हा सोहळा आम्हा बालवारकऱ्यांसाठी आयुष्यभर स्मरणात राहील, असेही या विद्यार्थ्यांनी नमूद केले. आध्यात्मिक शिक्षणासह विद्यार्थ्यांचे कलात्मक गुण विकसित व्हावे, म्हणून ही संस्था कार्यरत आहे.

paduka darshan sohala 2024 | esakal

मृदंग, तबला, टाळ अशा वादनासह गायनाचे धडेदेखील ही मंडळी गिरवितात. यातील काही विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत.

paduka darshan sohala 2024 | esakal

एकाच ठिकाणी १८ पादुकांचे दर्शन घेण्याचे भाग्य आपल्या सवंगड्यांना मिळत असून आपण यात सहभागी होऊ शकत नसल्याने या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाल्याची आठवण सतीश महाराज भिताडे यांनी सांगितली.

paduka darshan sohala 2024 | esakal

टाळ-मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनाम... आळंदी येथून आलेल्या बाल वारकऱ्यांनी घातलेल्या रिंगण सोहळ्याने भाविकांची मने जिंकली.

paduka darshan sohala 2024 | esakal

श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाला सुरुवात होत असतानाच मुख्य प्रवेशद्वारात बाल वारकऱ्यांची दिंडी आणि रिंगण पाहण्याची संधी भाविकांना मिळाली. 

paduka darshan sohala 2024 | esakal

या वेळी सतीश महाराज भिंताडे, अरविंद सैद यांच्यासह चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते.

paduka darshan sohala 2024 | esakal

मंत्री सामंत, लोढांनी घेतला 'पादुका दर्शना'चा लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paduka Darshan Sohala | esakal
येथे क्लिक करा...