संतोष कानडे
सकाळ माध्यम समुहाच्या वतीने फॅमिला गाईड या उपक्रमांतर्गत पादुका दर्शन सोहळा सुरु आहे
नवी मुंबईच्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरु असलेल्या पादुका दर्शन सोहळ्याचा बुधवारी दुसरा दिवस आहे
पहिल्या दिवशी मंत्री उदय सामंत यांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला
उदय सामंत यांच्यासह मंत्री मंगलप्रभात लोढा हेदेखील साधू-संतांच्या पादुकांसमोर नतमस्तक झाले
पहिल्याच दिवशी अनेक प्रतिष्ठित, दिग्गजांनी पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला. बॉलिवूड कलाकारांचीही उपस्थिती होती
हजारो भाविकांनी वाशीमधील हा भक्तिसोहळा डोळ्यात साठवून घेत अध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेतला
वाशीमध्ये टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जप, दिंडी, रिंगण आणि अभंगाचे सूर.. असा भक्तिमय सोहळा रंगला आहे
अध्यात्मिक, शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधता यावी, यासाठी 'सकाळ'च्या वतीने 'संकल्प ते सिद्धी' हा सोहळा आयोजित केला आहे
भाविक मोठ्या संख्येने 'पादुका दर्शन' सोहळ्याचा लाभ घेत आहेत