Sandip Kapde
छत्रपती शहाजीराजे यांनी जिजामाता आणि बालशिवाजीला सुरक्षा हेतूने पुण्यात पाठवले होते.
शहाजीराजे भोसले यांनी 1636 साली पुण्यात लाल महाल बांधला. सोबत तेथील भग्न मंदिर आणि वास्तूंचा जीर्णोद्धार देखील करण्यात आला.
जिजाऊंनी कसबा गणेशाचे मंदिर बांधून गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली होती. त्यानंतर सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्याचा अंकुर या मातीत पेरला.
कर्नाटकातून आलेल्या ठकार कुटुंबाकडे गणरायाची पूर्जाअर्चा आणि व्यवस्था देण्यात आली. ती आजही सुरु आहे.
१६४० ते १६४२ या कालावधीतील ही घटना असल्याची शक्यता आहे
पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसबा गणपती प्रसिध्द आहे.
मंदिराजवळील लाल महालातच शिवरायांचे बालपण गेले.
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे.
कसबा ही पुण्याची मुळ वस्ती आहे. येथून पुढे पुणे शहर आकारास आले.
जिजाऊंना स्वप्नात गणपतीने दृष्टांत दिल्याने त्यांनी या गणपतीची स्थापना केली असे म्हटले जाते.
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. इथून पुढे पुणे शहर आकारास आले.
पुण्यात वास्तव्य असताना प्रत्येक मोहिमेपूर्वी महाराज कसबा गणपतीचे दर्शन घेऊन निघत असत.
जिजाऊंच्या कष्टाला आणि शिवबाच्या प्रयत्नाला कसबा गणपतीच्या आशीर्वादाची जोड मिळाली.
जिजाऊंच्या मनात स्वराज्याचे स्वप्न बहरू लागले. ते स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.