Swadesh Ghanekar
जो रूटने इंग्लंडचा डाव सावरताना तीन खेळाडूंसोबत दमदार भागीदारी केल्या. रूटने २६२ धावांची खेळी केली.
हॅरी ब्रूकने कारकीर्दितील पहिल्या द्विशतकाचे त्रिशतकात रुपांतर करून इतिहास रचला. त्याने ३२२ चेंडूंत ३१७ धावा चोपल्या.
हॅरी ब्रूक हा इंग्लंडकडून घरच्या मैदानाबाहेर द्विशतक झळकावणारा चौथा युवा ( २५ वर्ष व २३१ दिवस) फलंदाज ठरला.
जो रूट व हॅरी ब्रूक यांनी आतापर्यंत ४५४ धावांची भागीदारी केली आहे.ही इंग्लंडसाठी सर्वोत्तम भागीदारी ठरली.
इंग्लंडच्या ७ बाद ८२३ धावा हा २१ व्या शतकातील पुरुष कसोटी क्रिकेटमधील एका डावातील सर्वोत्तम धावा ठरल्या.
पाकिस्तानविरुद्ध कसोटीत आतापर्यंत पाच खेळाडूंना त्रिशतक झळकावता आले आहे.
वेस्ट इंडिजचे महान फलंदाज गॅरी सोबर्स यांनी १९५८ मध्ये किंग्स्टन कसोटीत नाबाद ३६५ धावा केल्या होत्या
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने २०१९ मध्ये एडिलेडवर नाबाद ३३५ धावांची खेळी केली होती
ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलरने पेशावर येथे १९९८ मध्ये नाबाद ३३४ धावा केल्या होत्या.
हॅरी ब्रूकने काल मुलतान कसोटीत ३१७ धावांची वादळी खेळी केली.
भारताच्या वीरेंद्र सेहवागने २००४ मध्ये मुलतानवरच ३०९ धावांची फटकेबाजी केली होती.