पाकिस्तानचा असा आहे T20 World Cup चा इतिहास

Pranali Kodre

टी२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत १४ जून रोजी होणारा अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला.

India vs USA | Sakal

त्याचमुळे अमेरिकेचे ५ गुण झाले. यासह अमेरिकेने या स्पर्धेतील पुढच्या फेरीत म्हणजेच सुपर-८ मध्ये प्रवेश केला.

India vs USA | Sakal

मात्र अमेरिकेच्या पुढच्या फेरीतील प्रवेशाने पाकिस्तान संघाचं आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तान पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कपच्या पहिल्या फेरीतून बाहेर झाले आहेत.

Pakistan Cricket Team | X/TheRealPCB

टी२० वर्ल्ड कप २००७

पाकिस्तान २००७ टी२० वर्ल्ड कपमध्ये उपविजेते होते.

Pakistan Cricket Team | Sakal

टी२० वर्ल्ड कप २००९

पाकिस्तानने टी२० वर्ल्ड कप २००९ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.

Pakistan Cricket Team | Sakal

टी२० वर्ल्ड कप २०१० आणि २०१२

पाकिस्तानने २०१० आणि २०१२ साली झालेल्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. मात्र त्यांचा उपांत्य सामन्यात पराभव झाला.

Pakistan Cricket Team | X/TheRealPCB

टी२० वर्ल्ड कप २०१४ आणि २०१६

पाकिस्तानला २०१४ आणि २०१६ साली झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये सुपर १० फेरीच्या पुढे जाता आलं नव्हतं.

Pakistan Cricket Team | X/TheRealPCB

टी२० वर्ल्ड कप २०२१

पाकिस्तान टी२० वर्ल्ड कप २०२१ मध्ये उपांत्य फेरीत पोहचले होते. मात्र त्यांना उपांत्य फेरीत पराभव स्विकारावा लागला.

Pakistan Cricket Team | X/TheRealPCB

टी२० वर्ल्ड कप २०२२

पाकिस्तानने टी२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये अंतिम सामन्यात धडक मारली होती. मात्र, इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Pakistan vs England | X/ICC

भारताविरुद्ध ५ धावांची अमेरिकेला पेनल्टी बसलेला स्टॉप-क्लॉक नियम आहे काय?

India vs USA Stop Clock Rule | Sakal
येथे क्लिक करा