रोहित कणसे
क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान सध्या अडचणीत सापडले आहेत.
चार वर्ष पाकचे पंतप्रधान राहिलेले ७० वर्षीय इम्राण खान यांना पाकिस्तान रेंजर्सनीआज अटक केली आहे.
त्यांचं सरकार कोसळल्यानंतर त्यांच्याविरोधात तब्बल १०० हून अधीक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
इम्रान खान यांनी पाकिस्तानला १९९२ मध्ये क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियन बनवलं होतं.
ऑस्ट्रेलियात खेळलेल्या या स्पर्घेत इम्रान खान यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप जिंकता आला.
या विजयानंतर इम्रान खान नॅशनल हिरो बनले.
१९९७ मध्ये त्यांनी राजकारणात उतरत तारीक-ए-इन्साफ पक्षाची स्थापना केली.
बऱ्याच अपयशानंतर त्यांच्या पक्षाने २०१८ साली पहिल्यांदा मोठं यश मिळालं आणि इम्रान खान पंतप्रधान बनले.
मात्र इम्रान खान यांचं सरकारचा कार्यकाळ पूर्ण करू शकलं नाही, त्यांना एप्रील २०२२ मध्ये राजीनामा द्यावा लागला.
अखेर आज इम्रान खान यांना अटक झाली असून त्यांच्या पक्षाकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.