धनश्री भावसार-बगाडे
पावसाळ्यात पाणीपुरी खाण्याची इच्छा तर फार होते, पण बाहेरची पाणीपुरी खाण्याची हिम्मत होत नाही.
पावसाळ्यातली वाढती रोगराई आणि अस्वच्छता यामुळे बाहेरची पाणीपुरी खाऊ नका म्हणून अनेक तज्ज्ञ सांगतात.
पण असे असले तरी ठेल्याची चव मिस करताय? काळजी नको अगदी तशाच चवीचं पाणी तुम्हीही बनवू शकतात घरच्या घरी.
पुदिना - २ कप, कोथिंबीर - १ कप, कढीपत्ता - २ ते ३ काड्या, हिरव्या मिरच्या - ५ ते ६, जलजीरा पावडर - १ टेबलस्पून
जिरे पावडर - १ टेबलस्पून, पाणीपुरी पावडर मसाला - १ ते १. १/२ टेबलस्पून, हिंग - १/२ टेबलस्पून, मीठ - चवीनुसार, लिंबाचा रस - १ टेबलस्पून
पाणी - गरजेनुसार, जिरे - १/२ टेबलस्पून, कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली), खारी बुंदी - आवडीनुसार, लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
मिक्सरच्या एका भांड्यात कोथिंबीर, पुदिन्याची पाने, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, जलजीरा पावडर, जिरे पावडर, पाणीपुरी पावडर मसाला, हिंग, मीठ, लिंबाचा रस, पाणी, लाल मिरची पावडर, मीठ घालून या सगळ्या मिश्रणाची पातळ पेस्ट करावी.
आता हे मिश्रण एका गाळणीतून गाळून घ्यावे. चोथा फेकून द्यावा. तयार झालेल्या मिश्रणात आपल्या गरजेनुसार पाणी घालून घट्ट किंवा पातळ करून घ्यावे.
आता त्यात १/२ टेबलस्पून जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि आवडीनुसार खारी बुंदी घालून पाणीपुरीचे पाणी पुरी आणि गरमागरम रगड्यासोबत सर्व्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.