Monika Lonkar –Kumbhar
पपई आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
भरपूर पोषकतत्वांनी उपयुक्त असलेली पपई आरोग्यासोबतच त्वचेसाठी उपयुक्त आहे.
कोरफड त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार दिसण्यास मदत होते. कोरफड-पपईचा फेसपॅक कसा बनवायचा? जाणून घेऊयात.
सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे कोरफड जेल घ्या.
आता या कोरफड जेलमध्ये ३ चमचे पपईची पेस्ट मिसळा.
ही पेस्ट चेहऱ्यावर १०-१५ मिनिटांसाठी ठेवा.
त्यानंतर, तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे चेहरा हायड्रेटेड राहतो.