सकाळ डिजिटल टीम
आजकाल अनेक प्रकारच्या बिया खाण्याचे फायदे सांगितले जातात.
जर तुम्ही भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या फायदेशीर बियाण्यांसोबत पपईच्या बिया देखील फायदेशीर मानत असाल तर थांबा!
पपईच्या बिया फायदेशीर आहेत असं समजून खाण्याची चूक करू नका. हे शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते.
जर पपईच्या बियांचे सेवन सतत दीर्घकाळ केले, तर ते केवळ पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी करत नाहीत, तर शुक्राणूंची गुणवत्ता देखील कमी करतात.
प्राण्यांवर केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलंय, की पपईच्या बियांमध्ये आढळणारे अर्क यकृताच्या पेशींना नुकसान पोहोचवतात आणि डीएनए खराब करतात. यामुळे यकृताला तीव्र इजा होते आणि यकृत सिरोसिसचा धोका वाढतो.
कच्ची पपई खाल्ल्याने गर्भाशयात संकोचन होते, त्यामुळे कच्च्या पपईच्या बिया खाऊ नयेत. मात्र, पिकलेल्या पपईमुळे गर्भाशयाला कोणतीही हानी होत नाही.
पपईच्या बिया खाल्ल्याने निरोगी पेशींवर वाईट परिणाम होतो आणि पेशींचे नुकसान होते. हे संशोधन काही दिवसांपूर्वी उंदरांवर करण्यात आलं होतं.
जर तुम्हाला पपईशी संबंधित जास्तीत जास्त आरोग्य फायदे हवे असतील, तर ते बियाशिवाय खावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.