सकाळ डिजिटल टीम
बहुतेक लोक बाहेरचा चहा कागदाच्या कपातून पितात. जर, तुम्हीही पेपर कपमधून चहा पित असाल, तर तसं करणं थांबवा.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पेपर कप बनवण्यासाठी अनेक प्रकारची रसायने वापरली जातात.
या रसायनांमुळे शरीरात विषारी पदार्थ वाढू शकतात, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
पेपर कपमध्ये चहा बनवला, तर चहासोबतच केमिकल्स पोटात वितळतात. यामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्याचा मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो.
पेपर कपमधून रसायनयुक्त चहा प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्याही वाढू शकतात. अशा परिस्थितीत अशा कपांमधून चहा पिणे टाळावे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पेपर कप बनवण्यासाठी केवळ रसायनच नाही तर, प्लास्टिक किंवा मेणाचाही वापर केला जातो. जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
अनेक अभ्यासातून असं दिसून आलंय, की चहासोबत पेपर कपचा लेप आपल्या पोटात वितळतो, ज्यामुळे रक्तदाबावरही परिणाम होतो. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.
एका अभ्यासानुसार, 'जर एखादी व्यक्ती कागदाच्या कपामधून दिवसातून 2 ते 3 वेळा चहा प्यायली, तर त्याच्या शरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण पोहोचतात.'
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.