साक्षी राऊत
हल्ली लहान लहान मुलांनासुद्धा चश्मा लागताना दिसतो. वेळेआधीच त्यांच्या आयसाइट कमकुवत होण्यामागे अनेक कारणं आहेत.
मुलांचे डोळे अनेक कारणांनी कमजोर होऊ शकतात. मुलांच्या डाएटपासून ते त्यांच्या लाइफस्टाइलपर्यंत सगळ्या गोष्टींचा परिणा मुलांवर दिसून येतो.
मुलांचे डोळे कमजोर होण्यामागे त्यांच्याएवढेच त्यांचे पालकसुद्धा जबाबदार आहेत.
प्रत्येक लहान मुलांना चटपटीत जेवायला आवडतं. मात्र पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी मुलांना जंक फूडपासून लांब ठेवावे. मुलांच्या आरोग्यासाठी ते गंभीर ठरू शकते.
हल्ली कमी वयाच्या मुलांकडे पालक मोबाईल सोपवतात. मोबाईल केवळ त्यांच्या मेंदूवरच नाही तर त्यांच्या डोळ्यांवरसुद्धा परिणाम होतो.
मुलं उशीरा रात्रीपर्यंत टीव्ही बघतात. मात्र त्यांच्या पालकांचं त्यांच्याकडे अजिबात लक्ष नसतं. त्यामुळे मुलांचे डोळे कमजोर होतात.
हल्ली मुले आपल्या मुलांना घराच्या बाहेर अजिबात निघू देत नाहीत. त्यांना आउटडोअर अॅक्टिव्हिटीपासून वंचित ठेवतात. त्याचा प्रभाव मुलांच्या मानसिक विकासावरही होतो.
पालकांनी मुलांच्या हाती मोबाईल देण्याची सवय टाळावी. तसेच मुलांना उशीरा रात्रीपर्यंत टीव्हीसमोर बसू देऊ नये.
तुमच्या मुलांना व्हिटामिन डी युक्त अन्न खाऊ घाला. जसे की टमाटर, गाजर, बीट इत्यादी. त्यामुळे मुलांच्या डोळ्याचे आरोग्य चांगले राहाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.