Pranali Kodre
भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा गाजवली.
तिने पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताला पहिले पदक जिंकून दिले. तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले.
त्यानंतर तिने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र गटात सरबजोतसह कांस्य पदक जिंकले.
त्यामुळे मनू भाकर दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदकं जिंकणारी पीव्ही सिंधू आणि सुशील कुमार यांच्यानंतरची तिसरीच खेळाडू ठरली.
विशेष म्हणजे मनूला तिसरं पदक जिंकण्याचीही संधी होती. पण ती २५ मीटर पिस्तुल प्रकारात महिलांच्या गटात चौथ्या क्रमांकावर राहिली.
दरम्यान मनू भाकर केवळ नेमबाजीतच नाही, तर आभ्यासातही हुशार आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की बारावीमध्ये १०० पैकी ९० च्या पुढेच गुण होते.
मनू भाकरने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वूमन येथून पॉलिटीकल सायन्समध्ये ऑनर्स डिग्री घेतली आहे.
तसेच सध्या मनू पंजाब विद्यापीठातून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे.