Pranali Kodre
भारताची नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.
तिने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात महिला गटात कांस्य आणि मिश्र गटात सरबज्योतसह कांस्य पदक जिंकलं.
मनू भाकर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.
तसेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिलीच भारतीय ठरली.
त्यामुळे सध्या तिचे भारतभरात मोठे कौतुक होत असून अनेक ठिकाणी तिचा सन्मान करण्यात आला आहे.
नुकतेच तिने 'कॉस्मोपॉलिटन' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आवडत्या खेळाडूंबद्दल सांगितले.
मनूने सांगितले की धावपटू उसेन बोल्ट तिला आवडतो, तिने त्याचं पुस्तकही वाचलं आहे आणि अनेक मुलाखतीही पाहिल्या आहेत.
याशिवाय भारतातील क्रीडापटूंबद्दल सांगताना ती म्हणाली तिला सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली हे आवडतात. तसेच त्यांच्याबरोबर एखादा तासही वेळ घालवायला आवडेल.