तब्बल १०० वर्षांनी पुन्हा पॅरिसमध्ये परतला ऑलिंपिक, जाणून घ्या कोण-कोणत्या ठिकाणी होतील स्पर्धा..

सकाळ डिजिटल टीम

१५००० पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. ऑलिंपिकमध्ये एकूण २०६ तर पॅरालिंपिक मध्ये एकूण १८४ देश सहभागी झाले असून, आतापर्यंत तब्बल १ कोटी ३० लाख तिकीटांची विक्री झालेली आहे.

Paris Olympics | sakal

जागतिक क्रीडा महोत्सवासाठी पॅरिस आणि आसपासची अनेक स्टेडियम्स सज्ज झाली आहेत. जवळपास ३१ स्टेडियम्स आणि काही ठिकाणांवर विविध खेळ खेळले जाणार आहेत. त्यातील काही मोजक्या ठिकाणांचा थोडक्यात परिचय...

Paris Olympics | sakal

हॉटल द व्हिल

पॅरिस शहरामधील सेन नदीकाठी असलेले हे एक ऐतिहासिक स्थळ असून ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या मॅरेथॉनची सुरुवात येथून होणार आहे.

hotel de ville | sakal

ला काँकॉर्द

पॅरिस ऑलिंपिकमध्ये समाविष्ठ असलेले हे एक आधुनिक ठिकाण आहे. रोमहर्षिक खेळ जसे की, बास्केटबॉल, ब्रेकिंग, सायकलिंग बीएमएक्स फ्रीस्टाइल, स्केटिंग या क्रीडा प्रकारांसाठी एकत्रित असलेले ते केंद्र आहे.

La Concorde | sakal

मार्सेल मरिना

भूमध्य समुद्रात सेलिंग शर्यतीचे केंद्र आहे. ऑलिंपिक स्पर्धा संपल्यानंतर मार्सेल मरिनाचे रुपांतर रुकास ब्लांक नॉटिकल स्टेडियम प्रशिक्षण केंद्रात होईल.

Marseille marina | sakal

मार्सेल स्टेडियम

फ्रांसमधील हे दुसरे सर्वात मोठे स्टेडियम असून पॅरिस ऑलिंपिकमधील प्रमुख फुटबॉल केंद्र आहे.

Marseille stadium | saka;

पार्क दे प्रास

४७,९२९ आसना क्षमतेच्या स्टेडियमवर १९९८ मधील विशवकरंडक तसेच २०२६ मधील युरो फुटबॉल कप अशा सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.

Parce des princes | sakal

पॅरिस ला डिफेंस अरेना

नाँतेरे शहरातील हे मोठे बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियम अप्रतिम क्रीडा सुविधांसाठी,भव्य स्क्रिनसोबतच वास्तुच्या देखणेपणासाठी ओळखले जाते. या स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते.

Paris la defense arena | sakal

पिअर मोरुआ स्टेडियम

या स्टेडियमचा अधिकतर वापर हा फुटबॉलसाठी होत असला तरी पॅरिस ऑलिंपिकमध्ये या ठिकाणी बास्केटबॉल आणि हँडबॉल स्पर्धा होणार आहे.

Pierre Mouroy stadium | sakal

पाँ अलेक्सझांडर 3

हा पूल ग्राँ पॅले व अनव्हॅलिद या दोन क्रीडा केंद्रांना जोडतो. या ठिकाणी वैयक्तिक सायकलिंग टाईम ट्रायल, मॅरेथॉन जलतरण, ट्रायथलॉन या शर्यतींचा समारोप होणार आहे.

Pont Alexzander III | sakal

पोर्ट दे ला शापेल अरेना

पॅरिसच्या उत्तरेला असलेली पर्यावरणपूर्वक बांधणी असून येथे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामने आयोजित केले जातात.मध्यम आकाराच्या या अरेनाची ८ हजार आसनाची क्षमता आहे. ऑलिंपिक संपल्यानंतर या ठिकाणी प्रमुख स्पर्धांचे नियोजन केले जाणार आहे.

port de la Chapelle arena | sakal

त्रोकादेरा

पॅरिसमधील महत्त्वाचे प्रतिकात्मक ठिकाण आहे. पॅरिस ऑलिंपिकनिमित्त ट्रायथलॉन,रोड सायकलिंग,आतापर्यंत तब्बल १ कोटी ३० लाख तिकीटांची विक्री झालेली आहे. अॅथलेटिकिसमधील मॅरेथॉन आणि २० किलोमीटरपर्यंत चालणार्‍या शर्यतीचे ते मुख्य केंद्र आहे. (वरील माहिती किशोर पेटकर यांच्या लेखातील असून अधिक माहितीसाठी सकाळ साप्ताहिक अंकाला भेट द्या.)

Trocadero | sakal

१० हजार खेळाडू अन् तरंगतं संचलन... ऑलिंपिक उद्घाटनाची वैशिष्ठे...

Paris Olympic 2024 | Sakal
येथे क्लिक करा