Pranali Kodre
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २६ जुलैला रात्री पार पडला.
पॅरिसमधील प्रसिद्ध सीन नदीच्या तीरावर हा उद्घाटन सोहळा पार पडला.
या उद्घाटन सोहळ्यात बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल भारताचे ध्वजधारक होते.
या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघ अगदी पारंपारिक वेशभूषेत दिसला.
भारताच्या महिला खेळाडूंनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.तसेच भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांच्या छटा साडीच्या किनारीला होत्या.
पुरुष खेळाडूंसाठी पांढरा कुर्ता, त्यावर जॅकेट आणि सलवार असा पोषाख आहे. पांढऱ्या जॅकेटच्या किनाऱ्यांनाही राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांची डिझाईन आहे.
भारतीय खेळाडूंचे या पारंपारिक वेशभूषेतील फोटो सध्या व्हायरल होत आहेत.