Pranali Kodre
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेला अधिकृतरित्या २६ जुलैपासून सुरुवात होत आहे.
२६ जुलै रोजी पॅरिसमधील सीन नदीच्या तीरावर ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडेल.
आत्तापर्यंत ऑलिम्पिकचे सर्व उद्घाटन सोहळे बंदिस्त स्टेडियममध्ये झाले होते, मात्र यंदा पहिल्यांदाच खुल्या आसमंतात हा सोहळा होणार आहे.
यावेळी सीन नदीवर आठ किमी अंतरावर बोटीतून खेळाडूंचे संचलन होणार आहे.
खेळाडूंच्या संचालनासाठी १०० बोटी असणार आहेत आणि त्यात जवळपास १० हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.
हा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी जवळपास दीड लाखांहून प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या उद्घाटन सोहळ्यात लेडी गागा, सेलिन डायन, टेलर स्विफ्ट, अया नाकामुरा हे कलाकार आपली अदाकारी सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११ वाजता हा कार्यक्रम होणार असून थेट प्रक्षेपम स्पोर्ट्स 18 आणि जिओ सिनेमावर पाहाता येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यात पीव्ही सिंधू आणि शरथ कमाल भारताचे ध्वजधारक असतील.