Sandip Kapde
सध्या सुरू असलेले पॅरिस 2024 ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्स फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेली सर्वात मोठी स्पर्धा आहे.
26 जुलैपासून ऑलिम्पिक खेळ सुरू झाले असून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत.
या कालावधीत खेळला जाणारा प्रत्येक खेळ आणि त्यातले विजय-पराजय इतिहासात नोंदवले जातील.
सध्या दररोज वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंच्या विविध खेळातील विजयाच्या बातम्या येत असतात.
एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
नुकतीच बातमी आली होती की पॅराग्वेची जलतरणपटू लुआना अलोन्सो हिला तिच्या वागणुकीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून मायदेशी पाठवण्यात आले
त्यानंतर तिने जलतरणातूनही निवृत्ती घेतली आहे. मात्र आता दुसरंच कारम समोर आलं आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, लुआनाला मायदेशी पाठवण्यात आले आहे कारण तिचे अफाट सौंदर्य संघातील उर्वरित खेळाडूंचे लक्ष विचलित करत होते
ब्लास्टने दिलेल्या वृत्तानुसार, लुआनाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकली, बहुतेक पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंची, आणि ती तिच्यासाठी खूप महागात पडली.
पॅराग्वेला परतल्यानंत तिने जलतरणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
लुआना स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली नसली तरीही, 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पॅरिस गेम्सच्या अधिकृत समारोपापर्यंत खेळाडूंना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहण्याची परवानगी आहे.
राष्ट्रीय संघ व्यवस्थापकाने दावा केला आहे की लुआनाच्या उपस्थिती त्याच्या संपूर्ण पॅराग्वे संघावर वाईट प्रभाव पाडत आहे.