Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने बांगलादेश विरुद्ध अँटिग्वा येथे झालेल्या सुपर-८ मधील सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार २८ धावांनी विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाच्या या विजयात पॅट कमिन्सने हॅट्रिक घेत मोलाचा वाटा उचलला.
कमिन्सने महमुद्दुलाह, मेहदी हसन आणि तोहिद हृदोय यांना सलग ३ चेंडूवर बाद करत हॅट्रिक घेतली.
पुरुष टी२० वर्ल्ड कपच्या इतिहासात हॅट्रिक घेणारा कमिन्स दुसराच ऑस्ट्रेलियन तर एकूण सातवा गोलंदाज आहे.
सर्वात आधी टी२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने २००७ साली बांगलादेशविरुद्धच केप टाऊनला झालेल्या सामन्यात हॅट्रिक साजरी केली होती.
आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने २०२१ टी२० वर्ल्ड कपमध्ये अबुधाबीला नेदरलँड्स विरुद्ध झालेल्या सामन्यात हॅट्रिक घेतली होती.
श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने २०२१ टी२० वर्ल्ड कपमध्ये शाहजाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅट्रिक घेतली होती.
कागिसो रबाडानेही २०२१ टी२० वर्ल्ड कपमध्येच दक्षिण आफ्रिकेसाठी इंग्लंडविरुद्ध शारजामध्ये झालेल्या सामन्यात हॅट्रिक घेतली होती.
युएईच्या कार्तिक मय्यपनने २०२२ टी२० वर्ल्ड कपमध्ये जीलाँगला झालेल्या सामन्यांत श्रीलंकेविरुद्ध हॅट्रिक घेतली होती.
आयर्लंडच्या जोशुआ लिटिलने २०२२ टी२० वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ऍडलेडमध्ये हॅट्रिक घेतली होती.