रोहित कणसे
ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपमध्ये चॅम्पियन बनवणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आता आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
कमिन्सला सनरायजर्स हैद्राबादने २०.५ कोटी देऊन खरेदी केले आहे.
आज दुबईत झालेल्या लिलावादरम्यान कमिन्सला खरेदी करण्यासाठी सर्वच फ्रेचाइजींमध्ये चढाओढ लागल्याचे पाहायला मिळाले.
याआधी झालेल्या सर्व लिलावांचे रेकॉर्ड मोडत आयपीएलची सर्वात मोठी बोली ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सवर लागली होती.
कमिन्सने सॅम करन चा विक्रम मोडला असून तो यापूर्वी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
सनरायडर्स हैदराबादसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही कमिन्ससाठी बोली लावली पण शेवटी सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली.
अलीकडेच भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात पॅट कमिन्सने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले.
कमिन्सची बेस प्राइस 2 कोटी रुपये होती अन् त्याच्यावर पहिली बोली चेन्नई संघाने लावली होती, मात्र 7.60 कोटींची बोली लागल्यानंतर चेन्नई संघ बाबेर पडला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.