पॅट कमिन्सचा आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण?

Pranali Kodre

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्स त्याच्या कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत राहणारा क्रिकेटपटू आहे.

Pat Cummins | Sakal

यशस्वी कर्णधार

त्याने गेल्या वर्षभरात कर्णधार म्हणूनही मोठे यश मिळवले आहे. त्याने ऍशेस राखण्याबरोबर भारतीय संघाला पराभूत करत टेस्ट चॅम्पियनशीप 2023 आणि वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धाही जिंकली.

Pat Cummins | Sakal

आयपीएलमध्ये नेतृत्व

त्याचबरोबर तो आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचेही नेतृत्व करत आहे. विशेष म्हणजे आयपीएळ 2024 मधून तो पहिल्यांदाच टी20 मध्ये नेतृत्व करताना दिसलाय.

Pat Cummins | X/SunRisers

विक्रमी आयपीएल बोली

आयपीएल 2024 लिलावात सनरायझर्स हैदराबादने कमिन्ससाठी 20.5 कोटी रुपये मोजले. त्यामुळे लिलावात 20 कोटींहून अधिकची बोली लागलेला तो पहिला क्रिकेटपटू ठरला.

Pat Cummins | X/SunRisers

भारतही चर्चा

या सर्व गोष्टींमुळे त्याची भारतातही मोठी चर्चा आहे.

Pat Cummins | Sakal

आवडत्या भारतीय क्रिकेटपटूचा खुलासा

दरम्यान, नुकतेच त्याने ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना त्याला आवडणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूबद्दल खुलासा केला आहे.

Pat Cummins | Sakal

आवडता भारतीय क्रिकेटपटू

कमिन्सने सांगितले की जसप्रीत बुमराह हा त्याचा आवडता भारतीय क्रिकेटपटू आहे.

Pat Cummins | Sakal

कारण

कमिन्सने सांगितले की तो स्वत: वेगवान गोलंदाज असल्याने त्याला वेगवान गोलंदाजी करणारा बुमराह आवडतो.

pat cummins most expensive player of ipl history IPL 2024 Auction

IPL 2024 मधून बाहेर होणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ!

Mumbai Indians | Sakal
येथे क्लिक करा