Pranali Kodre
श्रीलंकेने इंग्लंडला सोमवारी (९ सप्टेंबर) कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात ८ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह श्रीलंकेने व्हाईटवॉश टाळला.
श्रीलंकेच्या या विजयात सलामीवीर पथुम निसंकाचे मोठे योगदान राहिले.
पथुम निसंकाने इंग्लंडने दिलेल्या २१९ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना १२४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १२७ धावांची नाबाद खेळी केली.
त्याच्या या शतकामुळे श्रीलंकेने २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग श्रीलंकेने २ विकेट्स गमावत ४०.३ षटकात पूर्ण केला. हा एका आशियाई संघाने इंग्लंडमध्ये केलेला सर्वोत्तम धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला आहे.
याबरोबरच निसंका तब्बल १३ वर्षांनंतर श्रीलंकेकडून इंग्लंडमध्ये खेळताना कसोटीत शतक करणारा सलामीवीर ठरला आहे.
निसंकापूर्वी श्रीलंकेकडून सलामीला इंग्लंडमध्ये शेवटचे कसोटीत शतक तिलकरत्ने दिलशान याने केले होते. त्याने लॉर्ड्सवर २०११ साली हा कारनामा केला होता.
तसेच निसंका आणि दिलशान यांच्याव्यतिरिक्त वेट्टीमुनी (१९८४), अलम रोहिता सिल्वा (१९८४), सनथ जयसुर्या (१९९८), मार्वन अटापट्टू (२००२), रसेल अरनॉल्ड (२००२) आणि मिचेल वॅनडोर्ट (२००६) या श्रीलंकन सलामीवीरांनी इंग्लंडमध्ये शतके केली आहेत.