Anuradha Vipat
अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींना घेऊन बिग बॉस ओटीटी 3 मध्ये पोहोचला होता.
अरमान दोन्ही पत्नींना घेऊन बिग बॉसमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली.
यामध्ये देवोलीना भट्टाचार्जी ने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर करत अरमान मलिक याच्यावर जोरदार टीका केली होती.
आता पायल मलिक ही बिग बॉस ओटीटी 3 मधून बाहेर आली आहे. आता देवोलीना भट्टाचार्जीचा चांगलाच समाचार पायल मलिक हिने घेतला आहे
पायल मलिक म्हणाली की, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बघायला हवे. तुम्ही एका मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर तुम्हाला सोशल मीडियावर किती जास्त लोकांनी सोशल मीडियावर खडेबोल सुनावले आहेत.
पुढे पायल मलिक म्हणाली की, मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की, जेव्हा आम्ही तुमच्या आयुष्याबद्दल काहीच बोललो नाहीत तर आमच्या आयुष्याबद्दल बोलण्याचा काय अधिकार तुमच्याकडे आहे.
तुम्हाला आमच्या रिलेशनवर आणि आयुष्यावर बोलण्याचा अजिबात अधिकार नाहीये. बाकी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर गोष्टींचे सविस्तर उत्तर देईल असंही पुढे पायल मलिक म्हणाली
सुझान खानच्या आईने सुझानच्या लग्नाबद्दल केला मोठा खुलासा