Horoscope 22 April : 'या' राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी कमी जाणवतील

Monika Lonkar –Kumbhar

मेष

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन

दैनंदिन कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

कर्क

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

सिंह

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

कन्या

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

तूळ

प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक

अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

धनु

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर

एखादी भाग्यकारक घटना घडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ

आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मीन

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल कमी राहील.