धनश्री भावसार-बगाडे
अनेक जण म्हणतात चहाला वेळ नसते तर वेळेला चहा लागतो.
चहाला वेळेचे बंधन नसले तरी चव मात्र परफेक्ट हवी असा आग्रह चहा प्रेमींचा असतो.
पण टी स्टॉलसारखा म्हणा किंवा मनतृप्त करणारा अमृततुल्य चहा म्हणा, असा चहा प्रत्येकालाच जमतो असं नाही. पण जमवता मात्र येऊ शकतो.
बऱ्याच लोकांच म्हणणं असतं की, सकाळचा पहिला चहा चांगला असला की, दिवसही चांगला जातो. तोच बिघडला तर दिवसही बिघडतो.
काही लोकांना परफेक्ट चहा बनवता येतच नाही. याचाच अर्थ चहा बनवताना नक्कीच काहीतरी घोळ होतो.
चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
दूध फ्रीजमधून काढून नॉर्मल तापमानाला येऊ द्या. त्यानंतरच चहामध्ये घाला. गार दूध घालू नका.
आले आणि वेलची नीट कुटून मग चहाचे पाणी उकळत असतानाच त्यात घाला.
चहाचे पाणी मोठ्या आचेवर उकळू द्या. मग त्यात दूध घाला.
चहा बनवताना याला चमच्याने ढवळून मिक्स करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.