धनश्री भावसार-बगाडे
माणसाच्या सवयी या त्याच्या मानसिकतेवर म्हणजेच स्वभावावर अवलंबून असतात.
याच मानसिकतेवरून स्वभाव ठरत असल्याने सवयींवरून स्वभाव ओळखता येतो.
अमेरिकेच्या रिडर्स डायजेस्ट या मॅगझीनमधील तज्ज्ञांच्या मते खाणे-पिणे, बसणे, चालणे, लिहिणे, चप्पल बूटांची निवड यावरून स्वभाव समजतो.
जे लोक लवकर लवकर खातात ते फार महत्वाकांक्षी असतात, तर जे हळू हळू खातात त्यांना कंट्रोलमध्ये राहणं आवडतं.
ज्या लोकांना पायावर पाय ठेवून बसण्याची सवय असते ते लोक काहीतरी लपवत असतात.
जे लोक शरीराचं वजन पुढच्या दिशेला देऊन वेगात चालतात ते लोक फार प्रॉडक्टीव्ह आणि तार्कीक असतात.
जे लोक लांब लांब अक्षर काढतात त्यांना स्वातंत्र्य आणि एकटं राहणं पसंत असतं, तर ज्यांना जवळ जवळ लिहायची सवय असते त्यांना सोबत हवी असते.
जे लोक फ्लॅट चप्पल किंवा बूट घालू इच्छितात त्यांना पडद्या मागे राहून काम करायला आवडतं. ते परफेक्शनिस्ट असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.