Sudesh
आपल्यापैकी कित्येकांच्या घरात पाळीव प्राणी असतात. कित्येक लोक त्यांना घरातील सदस्यच समजतात.
कित्येक शतकांपासून माणूस पशुपालन करत आला आहे.
पूर्वीच्या काळी पाळीव प्राण्यांना घराबाहेर ठराविक जागेतच ठेवत असत.
मात्र, आजकाल कित्येक लोक श्वान, मांजर असे प्राणी घरामध्येच ठेवतात. हे प्राणी कित्येक वेळा आपल्या बेडरुममध्येही पोहोचतात.
अशामुळेच कित्येक आजार पसरण्याचा धोका असल्याची माहिती डायसन ग्लोबल डस्ट या संघटनेने दिली आहे.
भारतातील दर चारपैकी केवळ एकच पेट ओनर आपल्या पाळीव प्राण्यांच्या स्वच्छतेबाबत जागरुक असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
एका रिसर्चनुसार पाळीव प्राण्यांमध्ये बेसिलस एंथ्रेक्सिस नावाच्या विषाणूमुळे एंथ्रेक्स नावाचा आजार होऊ शकतो.
या विषाणूचा संसर्ग पाळीव प्राण्याच्या संपर्कात आलेल्या माणसांनाही होऊ शकतो, असंही यात म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.