Saisimran Ghashi
पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे. या काळात पितरांच्या तृप्तीसाठी आणि शांतीसाठी पिंडदान केले जाते.
एरवी कावळ्याला अंगणात काव काव करताच लोक हाकलून लावतात त्या कावळ्याला पितृ पक्षात एवढे महत्व का?
पितृपक्षात कावळ्याला जे अन्न दिले जाते ते का केले जाते यामागची कारणे जाणून घेऊया.
ज्ञानेश्वरीत माऊलींनी असे म्हटले आहे की, 'पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' अर्थात कावळ्याची काव काव शकुन आहे असे माऊलींनी सांगितले आहे.
कावळ्याची काव काव ऐकून अनेकांनी जरी त्याला अंगणातून हाकलून लावले असेल तरी कावळ्याची चपळता, सुक्ष्म दृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्याला आपले दूत बनवले होते.
म्हणून पितृपक्षात घरोघरी कावळ्याला बोलावले जाते. कावळ्याला दिसलेले अन्न यमराजपर्यंत पोहोचून पितरांना पोहोचते अशी श्रद्धा आहे.
त्यामुळे पितृपक्षाचा पंधरवाडा कावळ्यासाठी मानाचा असतो.
ही केवळ सामाजिक धारणांवर आधारित माहिती आहे. आमचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणे नाही. आम्ही याची पुष्टी करत नाही.