पुजा बोनकिले
हिंदू धर्मात 15 दिवसांच्या पितृ पक्षाला खुप महत्व आहे.
या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवर येतात आणि सर्वपित्री अमावस्येला पितृलोकात परत जातात.
या दिवसांमध्ये पितरांची आठवण रून त्यांचे श्राद्ध, तर्पण अर्पण केल्याने पितृदोषातून मुक्ती होते अशी मान्यता आहे.
यंदा पितृ पक्ष 17 सप्टेंबरपासून म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू झाले असून 2 ऑक्टोबर पितृपक्ष संपणार आहे.
जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत.
श्राध्द म्हणजे पुर्वजांची आठवण काढणे.
पिंडदान म्हणजे पितरांना अन्नदान करणे.
तर्पण म्हणजे जल अर्पण करणे.