Pranali Kodre
भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा हे नाव हमखास घेतले जाते.
गेली जवळपास दीड दशकापासून हे दोघेही भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहेत. दोघांनी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले.
दरम्यान, विराट आणि रोहित आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून जून २०२४ च्या अखेरीस निवृत्ती घेतली. तसेच काही वर्षात ते आता कसोटी आणि वनडेतूनही निवृत्त होऊ शकतात.
अशात विराट आणि रोहित यांची जागा भरून काढणे कठीण राहणार आहे.
भविष्यात त्यांची जागा कोणते खेळाडू घेऊ शकतात, याबाबत आता भारताचा क्रिकेटपटू पीयूष चावलाने आपले मत मांडले आहे.
पीयूष चावलाने म्हटले आहे की शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड हे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा वारसा पुढे चालवू शकतात.
शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवर बोलताना चावलाने म्हटले की गिल आणि ऋतुराज हे दोघेही स्पेशल खेळाडू आहेत.
गिल आणि ऋतुराज हे दोघेही सध्या भारतीय संघाचा भाग आहेत.