कार्तिक पुजारी
मीठ आणि साखर आपल्या दैनदिंन आहारात महत्त्वाचे आहेत, पण यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
'टॉक्सिक्स लिंक' या पर्यावरण संशोधन संस्थेच्या रिपोर्टमध्ये आपण खात असलेल्या मीठ आणि साखरेत प्लास्टिक असल्याचा दावा करण्यात आला आहे
आपण खात असलेल्या मीठ आणि साखरेत मायक्रोप्लॉस्टिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
संशोधनामध्ये, बाजारात विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व प्रकारच्या ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण सापडलेत
बाजारातील मीठ आणि साखरेमध्ये 0.1 मिलीमीटर (मिमी) ते 5 मिमी आकाराचे मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत
मीठ आणि साखरेमध्ये असलेल्या प्लास्टिकमुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर दीर्घकाळ होऊ शकतो
त्यामुळे यावर व्यापक संशोधनाची गरज निर्माण झाली आहे