पुन्हा-पुन्हा वापरलेली बाटली कमोड सीटपेक्षा घाणेरडी? धक्कादायक रिपोर्ट

Sudesh

प्लास्टिक बॉटल

प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणं हानीकारक आहे, हे आतापर्यंत कित्येक वेळा समोर आलं आहे.

Plastic Water Bottle Bacteria | eSakal

मायक्रोप्लास्टिक

प्लास्टिकची बॉटल वारंवार वापरल्यामुळे त्यातील मायक्रोप्लास्टिक हे हळू-हळू आपल्या शरीरात जातं. यामुळे प्लास्टिकच्या बाटलीचा पुनर्वापर टाळावा.

Plastic Water Bottle Bacteria | eSakal

कमोड सीट

एका नव्या रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे, की पाण्याच्या रीयूजेबल बाटल्यांच्या तोंडावर एका कमोडच्या सीटपेक्षा 40 हजार पट अधिक बॅक्टेरिया असू शकतात.

Plastic Water Bottle Bacteria | eSakal

संशोधन सादर

अमेरिकेतील वॉटरफिल्टरगुरू या कंपनीने हा रिसर्च केला आहे. पाण्याच्या बाटलीचं झाकण, तोंड आणि इतर भागांची तपासणी करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.

Plastic Water Bottle Bacteria | eSakal

प्राण्यांच्या प्लेटपेक्षा गंभीर

पाण्याच्या बाटलीवर आढळलेल्या बॅक्टेरियाचं प्रमाण हे चक्क श्वान किंवा मांजरांच्या जेवणाच्या प्लेटमध्ये असणाऱ्या बॅक्टेरियापेक्षा 14 पटींनी अधिक असल्याचं यात स्पष्ट झालं.

Plastic Water Bottle Bacteria | eSakal

कोणते बॅक्टेरिया?

यामध्ये बॉटलवर बेसिलियस आणि ग्राम निगेटिव्ह हे दोन बॅक्टेरिया सर्वाधिक प्रमाणात दिसून आले. यातील ग्राम निगेटिव्ह हा बॅक्टेरिया अधिक खतरनाक आहे, कारण यावर अँटीबायोटिक्स देखील काम करत नाहीत.

Plastic Water Bottle Bacteria | eSakal

तोंड लाऊन पिणं

संशोधकांनी सांगितलं, की तोंड लावून पाणी पिलेल्या बाटलीवर अधिक बॅक्टेरिया आढळून आले. अर्थात, दुसऱ्या संशोधनात असंही म्हटलं आहे, की हे बॅक्टेरिया आपल्या तोंडातील असू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Water Bottle Bacteria | eSakal