Pranali Kodre
कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे.
या सामन्यातील दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला.त्यामुळे केवळ दोन दिवसाचा खेळ बाकी राहिल्याने भारतीय संघाकडून चौथ्या दिवशी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने तर भारताच्या पहिल्या डावातील दुसऱ्या षटकात त्याच्या खेळीला सुरुवात केली.
खलीद अहमदने गोलंदाजी केलेल्या या षटकात रोहितने पहिल्या दोन चेंडूंवरच दोन षटकार ठोकले आणि आपल्या खेळीला सुरुवात केली.
दरम्यान, कसोटीमध्ये डावात खेळीला सुरुवात करतानाच पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकणारा रोहित पहिलाच सलामीवीर, तर एकूण फक्त चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम कोणत्या तीन खेळाडूंनी केलाय, हे पाहू.
फ्लॉफी विल्यम्स यांनी वेस्ट इंडिजकडून १९४८ साली ब्रिजटाऊनला झालेल्या कसोटीत इंग्लंडच्या जिम लेकर यांच्याविरुद्ध दुसऱ्या डावात सलग दोन षटकार ठोकत त्यांच्या खेळीची सुरुवात केली होती.
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचेही नाव याद आहे. सचिनने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईला झालेल्या कसोटीत दुसऱ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत नॅथन लायनविरुद्ध सलग दोन षटकार ठोकत त्याच्या खेळीची सुरुवात केली होती.
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव देखील या यादीत असून त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१९ मध्ये रांचीला झालेल्या कसोटीत जॉर्ज लिंड विरुद्ध सलग दोन षटकार ठोकत त्याच्या खेळीची सुरुवाक केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.