सकाळ डिजिटल टीम
क्रिकेटमध्ये एका षटकात ६ षटकार मारणे जवजवळ अवघडच. परंतु काही दिग्गज व नवख्या खेळाडूंनी हा कारनामा करून दाखवला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत एका षटकात ६ षटकार ५ खेळाडूंनी मारले आहेत. हे खेळाडू पुढीलप्रमाणे...
दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने २००७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध एकाच षटकात ६ षटकार मारण्याची कामगिरी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.
युवराज सिंगने २००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्टुअर्ट ब्रॉडला इंग्लंडविरुद्ध सलग सहा षटकार ठोकले होते.
२०२१ मध्ये वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डने अकिला धनंजयच्या गोलंदाजीवर सलग ६ षटकार मारून यादीतील तिसरा क्रमांक मिळवला.
यूएसएचा जसकरण मल्होत्रा २०२१ मध्ये पापुआ न्यू गिनीचा वेगवान गोलंदाज गौडी टोका विरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. अशी कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणारा चौथा खेळाडू ठरला.
२०२४ मध्ये कतारच्या कामरान खानच्या गोलंदाजीवर सलग ६ षटकार ठोकत नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी या यादीत सामील झाला.
वेस्ट इंडिजचे दिग्गज अष्टपैलू सर गारफिल्ड सोबर्स हे काउंटी क्रिकेटमध्ये सलग ६ चेंडूवर ६ षटकार मारण्याची कामगिरी करणारे पहिले खेळाडू ठरले होते.
भारताचे माजी फलंदाज रवी शास्त्रींनीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला आहे. त्यांनी रणजी क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळताना एकदा ६ चेंडूत ६ षटकार मारले होते.