Saisimran Ghashi
तरुण वयामध्ये केस पिकणे ही मोठी समस्या झाली आहे.अश्यात पिकलेले केस तोडणे योग्य की अयोग्य हा प्रश्न पडतो.
पांढरे केस होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण अनेकांना ही गोष्ट आवडत नाही.
आयुर्वेदात पांढरे केसांच्या निराकरणासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत.
आधुनिक विज्ञान पांढरे केसांच्या कारणांबद्दल विस्तृत संशोधन करत आहे.
पांढरे केस मेलानिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे होतात.
पांढरे केस तोडल्याने बाकी काळे केस पिकतात हा समज चुकीचा आहे,असे डॉ. क्रॅलेटी यांचे म्हणणे आहे. पण याने केसांची मुळे कमकुवत होतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी तज्ञांची मदत घ्या.