कार्तिक पुजारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या कंधमाल येथे सभा घेतली.
यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पद्मश्री पुरस्कार प्राप्त आदिवासी कवी पूर्णमासी जानी यांची भेट घेतली.
या वेळी मोदींनी त्यांना सन्मान केला अन् चरण स्पर्श करुन आशीर्वाद घेतला. पूर्णमासी या कोण आहेत हे जाणून घेऊया.
पूर्णमासी जानी यांचा जन्म १९४४ साली झाला होता. त्या ८० वर्षांच्या आहेत.
त्या तडीसरु बाई नावाने देखील ओळखल्या जातात. त्या कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
ओडिया, कुई आणि संस्कृत भाषेमध्ये त्यांनी ५० हजारांहून अधिक भक्तिगीते लिहिली आहेत.
२०२१ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला होता.