मोदी 3.0 मंत्रिमंडळात कोणत्या महिलांना मिळाले स्थान?

पुजा बोनकिले

नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे.

नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 72 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ आहे. या मंत्रिमंडळात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असावा, याची विशेष काळजी मोदींनी घेतली आहे.

मोदी मंत्रिमंडळात महिला शक्तीला स्थान देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात सात महिला मंत्र्यांना स्थान मिळाले आहे.

माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

उत्तर प्रदेशमधून निवडून आलेल्या अनुप्रिया पटेल यांचा समावेश आहे.

कर्नाटकमधून निवडून आलेल्या शोभा करंदलाजे यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

पहिल्यांदाच मंत्री झालेल्या महिला नेत्यांमध्ये 37 वर्षीय रक्षा खडसे यांच्या नावाचाही समावेश आहे. या मंत्रिमंडळातील त्या सर्वात तरुण महिला मंत्री असल्याने त्यांचीही चर्चा होत आहे.

याशिवाय सावित्री ठाकूर आणि नीमू बेन बांभनिया यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

fruits | sakal
आणखी वाचा