कार्तिक पुजारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जंगम मालमत्ता ३.०२ कोटी रुपये आहे.
तसेच त्यांच्याकडे ५२ हजार ९२० रुपये रोख आहेत. त्यांच्या नावे जमीन, घर किंवा कार काहीही नाही.
पंतप्रधान मोदी यांची २,८५,६०,३३८ कोटी रुपयांचे एसबीआयच्या बँक खात्यात फिक्स डिपॉझिट आहे
पंतप्रधान मोदी यांची करपात्र उत्पन्न दुप्पट झाले आहे. २०१८-१९ मध्ये त्यांची करपात्र उत्पन्न ११ लाख होते, ते २०२२-२३ मध्ये २३.५ लाख रुपये झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दोन खाते आहेत.
त्यातील गांधीनगर शाखेच्या खात्यात ७३,३०४ रुपये, तर वाराणसी शाखेच्या बँक खात्यात सात हजार रुपये आहेत.
त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांची किंमत २, ६७,७५० रुपयांचे आहेत.