PM Modi Property : या फकिराच्या 'झोळी'त काय काय आहे?

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना देशभरातून, जगभरातून शुभेच्छा येत आहेत. त्यानिमित्त जाणून घ्या नरेंद्र मोदींच्या संपत्तीबद्दल...

पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींची संपत्ती घोषित करण्यात आली आहे. मोदींच्या नावे एकूण २.२३ कोटींची संपत्ती आहे. गेल्या वर्षभरात यामध्ये २६ लाखांची वाढ झाली आहे.

यापैकी बहुतांश संपत्ती रोख रकमेच्या स्वरुपात बँक खात्यामध्ये आहेत.

मोदींच्या नावावर असलेली गुजरातच्या गांधीनगरमधली जमीन त्यांनी दान केली आहे.

मोदींनी कोणत्याही शेअर्समध्ये किंवा बाँड्समध्ये गुंतवणूक केलेली नाही. त्यांच्या नावावर कोणतंही वाहन नाही.

मोदींकडे सोन्याच्या काही अंगठ्या आहेत. त्यांची किंमत १.७३ लाख रुपये आहे.

सध्या मोदींकडे फक्त ३५ हजाराच्या आसपास रोकड आहे. त्यांच्या नावे १ लाख ८९ हजार ३०५ रुपयांची विमा पॉलिसी आहे.

पोस्टातही त्यांच्या नावावर ९ लाखाच्या आसपास रक्कम आहे.

पंतप्रधान पदावर आल्यानंतर मोदींनी कोणतीही नवी प्रॉपर्टी खरेदी केलेली नाही. आत्ता ते जिथं राहतायत, त्या घराची किंमत सध्याच्या भावानुसार एक कोटीच्या आसपास आहे.

पंतप्रधान मोदींच्या या संपत्तीची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी मालमत्ता जाहीर केली जाते.

पंतप्रधान मोदींच्या वेबसाईटवरही संपत्तीची माहिती उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.