कार्तिक पुजारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी-सकाळी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली.
पंतप्रधान मोदींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
एका फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये कॅमेरा पाहायला मिळत आहे.
मोदींच्या हातातील हा कॅमेरा पाहून लोकांना एक किस्सा नक्कीच आठवला असेल.
मोदी यांनी सांगितलं होतं की, १९८७-८८ मध्ये त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते एलके अडवाणी यांचा रंगीत फोटो काढण्यासाठी डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता.
तसेच दिल्लीमध्ये फोटो पाठवण्यासाठी ई-मेलचा वापर केला होता.
अनेकांनी आक्षेप घेत म्हटलं होतं की, १९९५ मध्ये ई-मेल सेवा सुरु झाली. मग, मोदींनी त्याआधीच ई-मेलचा वापर कसा केला.
पहिला डिजिटल कॅमेरा लाँच होण्यापूर्वी आठ वर्षआधी मोदींनी तो कसा वापरला? असा प्रश्न लोकांना पडला होता