Poco F6 First Sale : Poco F6 उद्यापासून खरेदीसाठी उपलब्ध

सकाळ डिजिटल टीम

Poco F6 Launch

Poco ने भारतात बहुचर्चित आणि वेटिंगलिस्ट मध्ये असलेला Poco F6 स्मार्टफोन लॉन्च केले आहे.

Mid Range 5G Mobile

हा एक मिड रेंज फोन आहे ज्याची किंमत रु. 29,999 पासून सुरु होते.

Snapdragon 8s Gen 3

क्वालकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसरवर चालणारा देशातील पहिला स्मार्टफोन हा देखील आहे.

29 May Live Sale

Poco F6 ची पहिली विक्री 29 मे रोजी Flipkart द्वारे होणार आहे.

3 मॉडेल्स उपलब्ध

Poco F6 तीन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे - 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB.

किंमत

रु. 29,999, रु. 31,999 आणि रु. 33,999 आहे. लॉन्च ऑफर्सचा एक भाग म्हणून, Poco F6 रु. 25,999 पासून विशेष सूट असलेल्या किंमतीत उपलब्ध असेल.

डिस्काउंट ऑफर

ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून फोन खरेदी करताना कंपनीने त्वरित रु. 2,000 सूट देखील जाहीर केली आहे. तसेच रु. 2,000 चा एक्सचेंज डिस्काउंट देखील आहे.

हा एक मल्टि फिचर आणि मिड रेंज स्मार्टफोन म्हणून लोकप्रिय ठरणार आहे.

NASA ने शेअर केले Black Hole चे 'हे' फोटो पाहून व्हाल थक्क