Monika Lonkar –Kumbhar
आपल्या हटके स्टाईल आणि बोल्डनेसमुळे टिव्ही मनोरंजन क्षेत्रात कायम चर्चेत असणाऱ्या मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे नुकतेच निधन झाले आहे.
तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती शेअर करण्यात आली आहे. या बातमीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगामुळे तिचा मृत्यू झाला आहे.
पूनम पांडे तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जायची. पूनमला योगा आणि सूर्यनमस्काराची फार आवड होती.
ती सतत तिचे योगा आणि सूर्यनमस्कार करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायची.
एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिचे फिटनेस सीक्रेट शेअर केले होतो. तिला सूर्यनमस्कार, योगा आणि वर्कआऊट करायला जास्त आवडत असल्याचे तिने सांगितले होते.
पूनमला हेल्दी खायला प्रचंड आवडायचे. तिच्या आहारामध्ये ताज्या फळांचा आणि ज्यूसचा समावेश होता. यासोबतच तिला ऑरेंज ज्यूस जास्त आवडायचा.
योगा, वर्कआऊटसोबतच पूनम डान्स आणि जॉगिंग करण्याला प्राधान्य द्यायची.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.