देवाधर्माला लागली अन् पॉर्न इंडस्ट्री सोडली!

सकाळ डिजिटल टीम

जवळपास एक दशकभर पॉर्न इंडस्ट्री गाजवलेली प्रसिद्ध पॉर्नस्टार ब्रिटनी डे ला मोरा. पण तिने आता ही इंडस्ट्री कायमची सोडलीय.

स्ट्रीप क्लबपासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर ती पॉर्नस्टार बनली. आपल्या करिअरबद्दल आणि पॉर्न इंडस्ट्री सोडण्याबद्दल भाष्य केलं आहे.

डे ला मोराने सांगितलं की, १८ वर्षांची झाल्यानंतर स्ट्रीप क्लबमध्ये डान्स करत असताना तिला दोन पुरुष भेटले. त्यांनी तिला एका रोमँटिक फिल्ममध्ये काम करण्याची ऑफर दिली.

त्यानंतर तिचं फोटोशूट झालं आणि ती फिल्मसाठी निवडली गेली. त्यानंतर तिने जवळपास सात वर्षे पॉर्न इंडस्ट्री गाजवली.

तिला ही इंडस्ट्री फक्त सुरुवातीचा एकच महिना आवडली. कारण त्यानंतर तिला लैंगिक संबंधातून होणाऱ्या आजाराची लागण झाली.

ती पुढे सांगते की, तरीही मला वाटलं नव्हतं मी चुकलेय, त्यामुळे मी पुढे काम करतच राहिले.

आयुष्याने भीषण वळण घेतलं जेव्हा ती ड्रग्ज, कोकेन, हेरोईन घेऊ लागली आणि व्यसनीच बनला.

मात्र तेव्हा तिला भान आलं. त्यानंतर तिने ही इंडस्ट्री सोडली आणि वडिलांसोबत चर्चमध्ये जायला सुरुवात केली. त्याबद्दल ती सांगते की, तेव्हा देव हाच आपल्याला या सगळ्यातून वाचवू शकतो, याची जाणीव झाली.

त्यानंतर तिने बायबल वाचण्यास सुरुवात केली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. त्यानंतर तिने एका पाद्रीशी लग्न केलं. या दोघांनी एक पुस्तकही लिहिलं आहे.

ती पॉर्न इंडस्ट्रीमधल्या इतर महिलांना दिशा देण्याचं, त्यांना या इंडस्ट्रीतून बाहेर काढण्याचे प्रयत्नही करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.